अवसरी –अवसरी खुर्द येथील काळभैरवनाथ सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा काळभैरवनाथ सभागृहमध्ये हभप ज्ञानेश्वर माऊली महाराज वाबळे यांच्या हस्ते पार पडला असल्याची माहिती उद्योजक आणि पतसंस्थेचे अध्यक्ष भरत भोर यांनी दिली. काळभैरवनाथ सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भरत भोर, उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, सोपानकाका शिंदे, सरपंच वैभव वायळ, माजी सरपंच कल्याण शिंदे, माजी सभापती, कारखान्याचे संचालक आनंदराव शिंदे, माजी उपसभापती संतोष भोर, धोंडीभाऊ शिंदे गुरुजी, अॅड. नवनाथ निघोट, संजय वायळ, रामदास भोर, मयुर पतसंस्थेचे अध्यक्ष हरिदास रामवत, राजेंद्र खेडकर, माजी सरपंच शकुंतला शिंदे, जनरल मॅनेजर दत्तात्रेय खोटे, सभासद, ठेवीदार, ग्रामस्थ सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते. अध्यक्ष भरत भोर म्हणाले की, काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या अवसरी खुर्द, मंचर, भोसरी, तुर्भे (नवी मुंबई), घाटकोपर, आणि कामोठे या ठिकाणी शाखा आहेत. संस्थेचे 9115 सभासद आहेत. संस्थेकडे 109 कोटी 16 लाख ठेवी आहेत. संस्थेने 80 कोटी 15 लाख रुपये कर्ज वाटप केले आहे. खेळते भांडवल 123 कोटी 26 लाख एवढे आहे. तर संमिश्र व्यवसाय 189 कोटी 31 लाख एवढे असल्याचे अध्यक्ष भरत भोर यांनी सांगितले.