Pune District : सरकारी कार्यालयात दिव्यांगांना योग्य सुविधा द्या

बारामती : सरकारी कार्यालयात दिव्यांगांना योग्य सुविधा पुरवा, दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करा, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाने प्रांतधिकारी वैभव नावाडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे युवा मोर्चा पुणे जिल्हा महामंत्री वैभव सोलनकर, तालुका अध्यक्ष जगदीश कोळेकर, शहर अध्यक्ष विवेक साळुंखे, सरचिटणीस संदीप केसकर, शुभम सूर्यवंशी, प्रसाद डिंबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. इंदापूर आणि बारामती तालुक्यात अनेक महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत. बारामती सारख्या ठिकाणी शासकीय कार्यालयात अनेक ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना सहकार्य केले जात नाही.
बुद्धीच्या आणि हिमतीच्या जोरावर समाजात उभे राहताना बांधव दिसतात.पण त्यांना सोयीसुविधा समाजात असल्या पाहिजेत. दिव्यांग व्यक्ती जेव्हा सरकारी कार्यालयात जातात तेव्हा शासकीय वर्ग मदत करत नाहीत. अशा वेळी दिव्यागांची हेंडसाळ होते.त्यामुळे त्यांची कामे वेळेत होत नाहीत.
त्यामुळे सरकारी कार्यालात स्वतंत्र दिव्यांग मदत केंद्र स्थापन करावे. बस स्थानक, रुग्णालये, पोलीस स्टेशन,तहसील कार्यालयांमध्ये मदत केंद्र उपलब्ध करावी. या मागणीचा शासन दरबारी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. प्रत्येक सरकारी कार्यालयात मदत केंद्र सुरू करण्यात यावीत, असे निवेदनात नमूद केले आहे.





