Pune District : महाळुंगे पडवळ येथे कृषिमंत्र्यांच्या कृत्याचा निषेध

मंचर – दररोज ६ शेतकरी आत्महत्या करत असताना राज्याचे कृषीमंत्री रमीत रमतात, याचा निषेध म्हणून हुतात्मा बाबू गेनु युवा प्रतिष्ठानच्या वतीने महाळुंगे पडवळ (ता.आंबेगाव) येथे कृषिमंत्र्यांच्या फोटोला पत्ते दाखवून ,फोटो व पत्ते जाळून मंगळवार, दि.२२ रोजी निषेध करण्यात आला.
महाळुंगे पडवळ येथील हुतात्मा बाबू गेनू चौकात हुतात्मा बाबू गेनु युवा प्रतिष्ठानच्या वतीने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध करण्यात आला.यावेळी बोलताना हुतात्मा बाबू गेनु युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर म्हणाले, राज्यात दररोज ६ शेतकरी आत्महत्या करत असताना राज्याचे कृषीमंत्री विधानसभेत ऑनलाईन रमी खेळतात. हे चित्र महाराष्ट्राची लाज वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे.
मंत्र्यांना कशाचेच भान नाही,अशी टीका करून ते म्हणाले, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री,कृषी मंत्र्यांना बेताल वक्तव्याबाबत वेसण घालू शकत नाहीत. कृषी मंत्र्याना घरी पाठवा,अशी ही मागणी त्यांनी केली. यावेळी आंदोलनात उपसरपंच अनिल पडवळ, हुतात्मा बाबू गेनू पुस्तकाचे लेखक वसंतराव भालेराव, याकूबभाई इनामदार, शिवाजी पडवळ, रामहरी पडवळ, सदानंद चासकर, सुदाम पडवळ, दगडू चासकर, माणिक सैद, गुलाब पडवळ,संदीप पडवळ, युवराज सैद यांच्या सह शेतकरी व प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.





