वाघाळेत सेवानिवृत्तीनिमित्त उत्साहाला उधाण : संपूर्ण गाव सहभागी रांजणगाव गणपती – वाघाळे (ता. शिरूर) येथील सैन्यात दीर्घ सेवा करून सन्मानाने निवृत्त झालेले सुभेदार सुरेशराव शेळके यांच्या सेवानिवृत्ती समारंभानिमित्त वाघाळे गावात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीमुळे गावात उत्साहाला उधाण आले. गावकऱ्यांचा अभिमानाने ऊर भरून आला आहे. मिरवणुकीची सुरुवात गावातील श्रीकृष्ण मंदिरापासून ढोल-ताशांच्या गजरात झाली. लेझीम पथक, बॅन्ड पथक, पारंपरिक वेशभूषा केलेले बालक व गावकरी, आणि सजवलेली खुली जीप यामुळे मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. गावातील महिलांनी रांगोळ्यांनी मार्ग सजवला होता, तर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी व जयघोषाने स्वागत करण्यात आले. यावेळी “जय हिंद”, “भारत माता की जय”, आणि अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. मिरवणुकीनंतर शेळके साहेबांचा सन्मान समारंभ पार पडला. त्यांना शाल, श्रीफळ, मानपत्र व विशेष स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची संचालक वाल्मीकराव कुरुंदळे, शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक सर्जेराव दसगुडे, मेजर सोन्याबापू दसगुडे, बबनराव पवार, शहाजी धुमाळ, शिवाजी पवार, अशोक थोरात, सुनील शेळके, अशोक शेळके, जगन्नाथ पाचरणे, पांडुरंग कारखिले, सरपंच नंदा संभाजी शेळके, कर्डेलवाडी गावचे माजी सरपंच संजय दसगुडे, राजेंद्र दसगुडे, दिनकर पाडळे, नवनाथ फरगडे, राजेंद्र भोसले, राजेंद्र धायबर, किसनराव गोरडे, सुहास काटे , सुरेश थोरात, आनंदराव सोनवणे, विश्वनाथ कारकुड, बबनराव भोसले, सूर्यकांत बढे, दिलीप थोरात, रावसाहेब थोरात, तालुक्यातील विविध संस्थांचे आजी- माजी पदाधिकारी, माजी सैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते. सुभेदार शेळके भावूक सुभेदार शेळके यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भव्य मिरवणुकीत ग्रामस्थ, शेतकरी, महिला बचत गट, तरुण मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाला होता. कार्यक्रमाच्या शेवटी सुभेदार शेळके यांनी भावूक होत सेवाकाळातील अनुभव सांगितले. ही मिरवणूक गावाच्या इतिहासात एक संस्मरणीय आणि प्रेरणादायी घटना म्हणून कायम स्मरणात राहील. तरुणांनी देशसेवा व समाजसेवेसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.