Pune district : पिंगोरीत समस्यांचा जागेवरच निपटारा

महाराजस्व समाधान शिबिरास प्रतिसाद
नीरा – पिंगोरी (ता. पुरंदर) येथील महाराजस्व अभियान अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरास प्रतिसाद मिळाला. गावात प्रथमच एवढ्या व्यापक प्रमाणावर शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. अनेक समस्यांचा जागेवरच निपटारा करण्यात आला.
सोमवारी सकाळी शिबिराची सुरुवात मंडळ अधिकारी संजय बडदे यांच्या हस्ते अर्ज स्वीकारून करण्यात आली. यावेळी ग्राममहसूल अधिकारी आदेश बोबडे, पोलीस पाटील राहुल शिंदे, सरपंच संदीप यादव, उपसरपंच भाग्यश्री शिंदे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शिंदे, जीवन शिंदे, ग्रामसेवक पुंडलिक मस्के, सचिन शिंदे, वसंत शिंदे, माजी सरपंच पल्लवी भोसले, धनंजय शिंदे उपस्थित होते. हे शिबीर घेण्याबाबत प्रमुख मागणी माजी उपसरपंच प्रकाश शिंदे यांनी केली होती.
त्यास प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत पुढील कामाचा जागेवरच निपाटारा केला. आभा कार्ड नोंदणी: 40, आयुष्यमान नोंदी: 18, संजय गांधी योजनेअंतर्गत नवीन अर्ज: 4, जुन्या प्रकरणांचे नूतनीकरण: 10, शेतकरी ओळखपत्र: 12, वारस नोंदी: 4, विवाह दाखले: 3, आठ अ उतारे: 8, हक्कसोड अर्ज: 1 रेशन कार्ड संदर्भातील प्रकरणे 14 अशी कामे करण्यात आल्याची माहिती मंडल अधिकारी संजय बडदे यांनी दिली.
पुरवठा विभागाच्या शीतल बोरकर व अश्विनी वायशे, रेशन दुकान चालिका नंदा शिंदे यांनी रेशन कार्डातील त्रुटींचे निराकरण केले. आरोग्य विभागाच्या जोत्सना सरकाळे, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका वैशाली शिंदे व मालती गायकवाड यांनी आरोग्य व पोषण संबंधित सेवा पुरवल्या. सेतू चालक किरण खरात, सुभाष देवकर, धनंजय तोरवे, यांनी विविध सेवा दिल्या.
पिंगोरीचे माजी उपसरपंच शिवसेनेचे कार्यकर्ते प्रकाश शिंदे यांनी हा उपक्रम पिंगोरी गावात राबवण्याची विनंती महसूल विभागाकडे केली होती. हे शिबीर पार पाडण्यासाठी गावातील तरुण ओंकार सुतार, सोहेल इनामदार, तुषार शिंदे परिश्रम घेतले . या शिबिरातून लोकांची कामे झाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करत असे उपक्रम वारंवार होण्याची अपेक्षा व्यक्त केली.





