पुणे जिल्हा : भुगाव-भूकूम हद्दीवर खाजगी बस जळून खाक
Updated On:

पिरंगुट – भुगाव आणि भुकूम गावच्या हद्दीवर कामगारांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसने अचानक पेट घेतला. यात बस जळून खाक झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार कामगारांना घेऊन ही खाजगी बस क्र (एम एच ४२बी ०१६९) पुण्याकडे चालली होती. गारवा हॉटेलच्या उताराला बसच्या बोनेटमधून अचानक धूर येत असल्याचे वाहन चालक प्रकाश भाऊसाहेब जाधव (वय ४४,रा वडगाव बु, सिंहगड रोड) यांच्या लक्षात येताच त्याने तत्काळ गाडी बाजूला घेतली. तात्काळ त्यांनी सर्व कामगारांना खाली उतरवले.
काही मिनिटांमध्येच गाडीने पेट घेतला. उरवडे येथील इनर्टेक कंपनीमधून १७ कामगारांना घेऊन पुण्यातील वारजे येथे सोडण्यासाठी निघालेली ही बस होती. परांजपे स्कीमच्या फॉरेस्ट ट्रेल या टाऊनशिप येथील उपलब्ध असलेल्या अग्निशमन गाडीने ही आग आटोक्यात आणली.





