पुणे जिल्हा : नाभिक संघटनेच्या (अ) शिरूर शहराध्यक्षपदी प्रितेश फुलडाळे

शिरूर : शिरूर शहर नाभिक संघटनेच्या ( अ ) अध्यक्षपदी येथील प्रितेश फुलडाळे यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक काम करत असताना फुलडाळे यांनी शिरूर शहरातील रस्त्याची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या,ड्रेनेज लाईनच्या समस्या, दशक्रिया विधी घाटावरील समस्या,मोकाट कुत्र्यांचा प्रश्न यांसह विविध विषयांवर समाजमा़ध्यमांमधून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम करत आहे.
शिरूर शहरातील नाभिक समाज बांधवांना विमा संरक्षण देण्याबरोबरच गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच आदर्श माता व आदर्श पिता पुरस्कर देऊन गौरविण्यात येणार आहे .
सर्वांना बरोबर घेऊन प्रत्येकाच्या सुचनांचा आदर करुन सर्वांच्या मार्गदर्शनाखाली समाजहिताचे विविध उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते फुलडाळे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शिरूर शहरासह तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





