पुणे जिल्हा : प्रीतम म्हेत्रेंचा आगळावेगळा आनंद सोहळा

सुनेत्रा पवार यांच्या निवडीचे स्वागत
वाल्हे – उद्योजक, पुणे जिल्हा राष्ट्रवादी चिटणीस प्रितम सुधाकर म्हेत्रे हे प्रकृतीच्या कारणास्तव हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. लोकसभा निवडणूकीतील पराभवानंतर सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल म्हेत्रे व कार्यकर्त्यांनी वैद्यकीय सेवेतील कर्मचारी वर्गाबरोबर आनंद व्यक्त करीत त्यांना पेढा भरवून आनंद व्यक्त केला. आजारपणातील वेदना थोड्या वेळासाठी का होईना विसरून त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
सासवड येथील उद्योजक, पुणे जिल्हा राष्ट्रवादी चिटणीस प्रितम सुधाकर म्हेञे हे मागील आठवड्यापासून, पुणे येथील हेलिंग हॅन्ड हॉस्पिटलमध्ये जठराच्या आजारपणामुळे रूग्णालयात दाखल झाले होते. यानंतर त्यांची शञक्रिया झाली. दरम्यान, (दि.१३) सुनेत्रा पवार यांची राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड झाल्याचा आनंद म्हेञे यांना इतका झाला की, नुकतीच शञक्रिया झाल्याचे विसरून त्यांनी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारीवर्गाबरोबर आनंदोत्सव साजरा करीत त्यांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.
उद्योजक प्रितम म्हेत्रे यांनी लोकसभा निवडणुकीत सासवड शहरातून सुनेत्रा पवार यांना जास्त मतदान कसे होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत सासवड शहरामध्ये झालेल्या मतदानापैकी ४० टक्के मतदान हे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार करण्यात म्हेत्रे यांचा मोलाचा वाटा होता.
म्हेत्रे यांच्या मातोश्री, सासवड नगरपरिषदच्या माजी नगरसेविका मंगल म्हेत्रे यांनी देखील सुनेत्रा पवार यांना जास्तीत जास्त मतदान कसे होईल, यासाठी प्रयत्न केले होते. सासवड शहरात घड्याळाला एकूण ६२३८ मतदान झाले होते. तुतारी चिन्हास सासवड शहरात ८५९१ मतदान झाले आहे.





