पुणे जिल्हा : दळणवळण, रस्ते, पाण्याचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य

महाविकास आघाडेचे उमेदवार सत्यशील शेरकर यांचे धोलवडआश्वासन
ओतूर – जुन्नर तालुक्यात दळणवळण व पाण्याचा प्रश्न प्रलंबित असून महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ते प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार, असे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार (पवार गट) सत्यशील शेरकर यांनी दिले.
सत्यशील शेरकर यांनी धोलवड येथील मतदारांशी संपर्क साधला. या प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनंतराव चौगुले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहित ढमाले, पुणे जिल्हा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे, तालुकाध्यक्ष तुषार थोरात,
अनिल तांबे, श्री विघ्नहर कारखान्याचे संचालक धनंजय डुंबरे, धोलवडचे सरपंच वैभव नलावडे, निवृत्ती मुंढे, सुभाष मुंढे, शिवसेना शाखा प्रमुख निवृत्ती मुंढे, बबन नलावडे, भारत नलावडे, अशोक मुंढे, संजय कासार, दिलीप मुंढे, कैलास नलावडे, पांडुरंग नलावडे, सुधाकर नलावडे, शंकर मुंढे, बबन नलावडे, कारभारी मुंढे, विक्रम नलावडे, प्रदिप मुंढे आदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.
सत्यशील शेरकर म्हणाले की, आघाडी सरकार आल्यावर विकास कांमासाठी निधीची कमी पडणार नाही , त्यामुळे आपण सर्वांनी महाविकास आघाडीला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे त्यांनी केले.
शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडणा-यांना त्यांची दाखवण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांनाच मतदान करायचे आहे. सर्व शिवसैनिकांनी जागरूक होऊन आपल्या हक्काच्या उमेदवाराला निवडून द्यायचे आहे. कोणाच्या भूलथापांना बळी पडू नका.
– माऊली खंडागळे, प्रमुख, जुन्नर तालुका, ठाकरे गट
धोलवड गाव हे शरद पवार व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे गाव आहे. आजपर्यंत कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी वेळोवेळी मदत करण्यात आली आहे. हा परीसर सुजलाम् सुफलाम् केवळ पवार यांच्यामुळेच झाला आहे. त्यामुळे गावातील सर्व मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे.
-वैभव नलावडे, सरपंच, धोलवड





