पुणे जिल्हा : तळेगावच्या गुजर प्रशालेत प्राणायम

तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेच्या प्रांगणात सकाळी योगासने व प्राणायाम प्रात्यक्षिकांना विद्यार्थ्यांकडून घेण्यात आली.
प्रशालेचे माजी पर्यवेक्षक प्रभाकर मुसळे, प्रशालेचे उपशिक्षक राजेंद्र भगत, नंदा सातपुते, पतंजली योग समितीचे अध्यक्ष अंकुशराव घारे व सूर्यकांत वाघोले यांनी विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. योगसाधनेच्या आधी प्रजापिता ब्रह्मकुमारी अर्चना यांनी विद्यार्थ्यांना राजयोग शिकवला.
वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकृती व्यायामाद्वारे विद्यार्थ्यांनी योग साधनेतून रेखाटल्या. प्रशालेत वक्तृत्व, चित्रकला, हस्ताक्षर स्पर्धा व निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे, प्रशालेचे मुख्याध्याक अशोक दहिफळे, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.





