पुणे जिल्हा : आंबेगाव विधानसभा मतदार संघाच्या टपाली मतदानास प्रारंभ

मंचर – आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या टपाली मतदानास शुक्रवारपासून प्रारंभ झालेला आहे. घोडेगाव येथे चपाती मतदानास सुरुवात झाल्याची माहिती टपाली मतदान कक्षाचे नोडल अधिकारी विठ्ठल सूर्यवंशी यांनी दिली.
निवडणूक कर्तव्यावर नेमणूक केलेला शासकीय नोकरवर्ग, इतर निवडणूक अनुषंगिक आवश्यक कर्तव्यावर नियुक्त केलेला वर्ग आणि पोलीस अंमलदार यांच्यासाठी टपाली मतदानाची सुविधा करून देण्यात आलेली आहे. टपाली मतदान केंद्र व सुविधा केंद्र चालू राहणार आहे.
बहुतांश लोकांच्या सुविधेचा विचार करून दिनांक 16 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत आंबेगाव तालुक्यातील जे कर्मचारी निवडणूक कर्तव्यासाठी अन्य तालुक्यात जाणार आहेत. त्यांना घोडेगाव येथेच तहसील कार्यालयात मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
ज्या कर्मचार्यांनी फॉर्म 12 अचूक रित्या भरलेला आहे अशा कर्मचार्यांना या टपाली मतदान सुविधेचा लाभ देण्यात येत आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील महिला कर्मचारी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातच कर्तव्यावर असणार आहेत.
ते त्यांच्या नोंदणीकृत मतदान केंद्रावर मतदान करू शकत नाहीत. म्हणून त्यांना निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र अर्थात ईडीसीचा लाभ देण्यात येतो त्याचीही वाटप. ईडीसी प्रमाणपत्रांचे वाटप चालू झालेले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली टपाली मतदान कक्षाचे नोडल
अधिकारी विठ्ठल सूर्यवंशी यांच्या पथकाने सदर टपाली मतदान कक्षाचे नियोजन केलेले आहे. तरी पात्र मतदारांनी तहसील कार्यालय घोडेगाव या ठिकाणी जाऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा. असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.





