Pune District : दारवली-अंबरवेट रस्त्याची दुरवस्था : नागरिक त्रस्त

पौड – दारवली-अंबरवेट (ता. मुळशी) या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यावरील खड्डे जलाशयात रूपांतरित होत असून अपघाताची शक्यता वाढली आहे.
या रस्त्यावरून दररोज शालेय विद्यार्थी, शेतकरी व स्थानिक नागरिक यांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. मात्र रस्त्यावर मोठाले खड्डे, उखडलेला डांबर व जागोजागी साचलेले पाणी यामुळे वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रार केली असूनही रस्त्याची डागडुजी किंवा दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी लवकरात लवकर रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे.
गेल्या दीड दोन महिन्यापूर्वी करण्यात आलेला रस्ता या पावसात खड्डेमय झाला आहे. यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर खड्डे बुजवावेत.
– मंगेश बलकवडे, माजी उपसरपंच, दारवली





