पुणे जिल्हा : राजकीय मतभेद-कौटुंबिक बाबी वेगळ्या – सुप्रिया सुळे
Updated On:

बारामती/ जळोची – गोविंदबागेत शरद पवार यांची दरवर्षी होणारी दिवाळी कालही एकत्र होती. आजही एकत्र आहे. उद्याही एकत्र राहील. आमच्यात राजकीय मतभेद आहेत.
राजकीय मतभेद आणि कौटुंबिक बाबी या वेगळ्या असतात. त्यामुळे कुटुंबातील नाती, जबाबदाऱ्या कुणीही डावलू नये, या मताची मी आहे. कारण आपण सुसंस्कृत आहोत. त्यामुळे या दोन गोष्टीत गल्लत करू नये, असा थेट टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.
जळोची येथील माळावरील देवीच्या दर्शनासाठी खासदार सुळे या आल्या असता पत्रकारांनी दिवाळी पाडव्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी भाष्य करीत या चर्चेवर पडदा टाकला.
खासदार सुळे म्हणाल्या की, गोविंदबाग हे केवळ शरद पवार यांचे निवासस्थान नसून महाराष्ट्रातील जनतेचे हक्काचे घर आहे. या घरावर जेवढा माझा हक्क आहे. त्याहून जास्त मायबाप जनतेचा आहे.





