पुणे जिल्हा : पारगाववासीयांमध्ये बिबट्याची दहशत
Updated On:

पारगाव शिंगवे – गोठ्यातील कालवडीवर बिट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना पारगाव (ता. आंबेगाव) येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
पारगाव गावच्या हद्दीतील लोंखडे मळा रस्त्याच्या कडेला अविनाश ढोबळे यांचा घराच्या बाजुला गायींचा गोठा असून बिबट्याने गोठ्यातील कालवडीवर हल्ला करून तिला ठार केले.
वनविभागाने या घटनेचा पंचनामा केला आहे. एक महिन्यापूर्वी लोंखडे मळा येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांच्या कालवडी तसेच पाळीव कुत्र्यांचा बिबट्याने उसाच्या शेतात घेऊन जाऊन फडशा पाडल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
गावामध्ये बिबट्याची दहशत वाढली असून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.





