पुणे जिल्हा : सात हजार मोतीचूर लाडू व महाप्रसादाचे आयोजन

मंचर : अयोध्या येथे होत असलेल्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमानिमित्त अवसरी खुर्द येथील पुरातन श्री राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सोमवारी (दि.22) आयोजित करण्यात आले आहेत.
गावातील श्री काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या वतीने सात हजार मोतीचूर लाडू व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे माजी अध्यक्ष व नवनिर्वाचित संचालक भरतराव भोर यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या येथे श्रीराम मंदिर पूर्ण झाले असून प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर अवसरी खुर्द येथे असलेल्या पुरातन श्री राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंदिर स्वच्छ धुऊन मंदिरांमध्ये फुलांची सजावट करून आकर्षक विद्युत रोषणाई करून मंदिरांमध्ये दीपप्रज्वलन करण्यात येणार आहे. तसेच यावेळी मंदिरात दर्शनासाठी येणार्या भाविकांना श्री काळभैरवनाथ सहकारी पतसंस्थेचे नवनवीन नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या वतीने 7 हजार मोतीचूर लाडू व महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.





