दौंड : दौंड शहर व तालुका शिवजयंती समितीच्या वतीने (दि.२६) एप्रिल रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे. स्पर्धेचे यंदा तेरावे वर्ष आहे. शहरात तिथीनुसार २९ एप्रिल रोजी साजरी होणार्या शिवजयंती निमित्त ही वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. दौंड- शिरापूर- सिध्दटेक अष्टविनायक मार्गावरील भीमनगर येथील (स्व) लाजवंती गॅरेला विद्यालयात २६ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. स्पर्धेसाठी पहिला गट (इयत्ता ३ री ते ५ वी), दुसरा गट (इयत्ता ६ वी ते ८ वी) , तिसरा गट (इयत्ता ९ वी ते १२ वी) आणि चौथा गट – खुला गट, असे चार गट तयार केले आहेत. विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.