Pune District : राजगुरूनगरात कांदा लिलाव

राजगुरूनगर : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजगुरूनगर येथील आवारात प्रथमच कांदा लिलाव रविवारी (दि. 9) सुरू करण्यात आला. या कांदा लिलावाचे उद्घाघाटन सभापती विजयसिंह शिंदे पाटील, उपसभापती क्रांती सोमवंशी व संचालकांच्या हस्ते झाले. कांदा खरेदी आणि लगेचच पैसे मिळणार असल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यावेळी संचालक उपसभापती क्रांती सोमवंशी, अशोक राक्षे, अनुराग जैद, माणिक गोरे, सागर मृर्हे, सोमनाथ मुंगसे, सचिव बाळासाहेब धंद्रे यांच्यासह व्यापारी, शेतकरी वाग मोठ्या संख्येने उपस्थित होता. दरम्यान तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकर्यांचा सन्मान करण्यात आला.
खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा पीक घेतात. उत्पादन होते मात्र बाजार पेठ नव्हती, चाकण, मंचर, नारायणगाव येथील बाजार समित्यांमध्ये शेतकरी कांदा विक्रीला नेत होते. गेल्या अनेक वर्षे खेड तालुक्यातील शेतकर्यांनी खेड बाजार समितीकडे चाकण आवारासह खेड (राजगुरूनगर) येथे कांदा खरेदी करण्याची मागणी केली जात होती. इतरत्र कांदा विक्रीसाठी नेला जात असल्याने शेतकर्यांचा वाहतूक खर्च व गैरसोयीला सामोरे जावे लागत होते.
मंगळवार, गुरुवार, रविवार या तीन दिवशी कांदा, बटाटा, लसूण, भुईमूग शेंग या शेतमालाचे उघड पद्धतीने लिलाव विक्री होणार आहे. लिलाव झाल्यानंतर मालविक्रीचे तात्काळ शेतकरीपट्टी प्रमाणे शेतकर्यांना पैसे मिळणार आहे.
अल्पदरात जेवण मिळणार
बाजार समितीचे चारचाकी वाहन वापरणे बंद केले असून विनाकारण होणार्या खर्चाला कात्री लावण्यात आली आहे. राजगुरूनगर आवारात शेतकर्यांसाठी लवकरच अल्पदरात जेवण, शुद्ध पाणी व स्वच्छतागृह उभारण्यात येणार असून इतर सुविधा पुरवल्या जाणार आहे. जास्तीत जास्त शेतकर्यांनी कांदा, बटाटा, लसुण भुईमूग शेंग विक्रीसाठी आणावा, असे आवाहनही सभापती विजयसिंह शिंदे यांनी केले आहे.





