पुणे जिल्हा : डींग्रजवाडी येथे सुरक्षाभिंत कोसळून दोघांचा मृत्यू
Updated On:

कोरेगाव भीमा : शिरूर तालुक्यातील डींग्रजवाडी येथील मुत्सुद्दीलाल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.ली. कंपनीची सुरक्षा भिंत कोसळून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
आज सकाळी ०८ वाजून ४६ मिनिटांनी सदर कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली. या दुर्घटनेत दोन कामगाराचा मृत्यू आहे. राजीव कुमार आणि मंजित कुमार असे मृत्युमुखी पडलेल्ल्यांची नावं आहेत. तर काहीजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदर घटनेत सुरक्षा भिंतींच्या बाजूला उभ्या असलेल्या चारचाकी, दुचाकी व कामगार वाहतुकीसाठी असणाऱ्या बसचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.





