वाघोली – हवेली तालुक्यातील आठ मंडल कार्यालयांचे (सर्कल ऑफिस) विभाजन केले असून, तालुक्यात आता 23 मंडल कार्यालये असणार आहेत. वाघोली मंडल कार्यालयाचे विभाजन झाले असून नव्याने लोणीकंद, अष्टापूर मंडल कार्यालये झाल्यानंतर नवीन मंडल अधिकार्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. हवेली तालुक्यात दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येमुळे आठ कार्यालयांवर येणारा भार, यामुळे नागरिकांची कामे रेंगाळत होती. विभाजन झाल्यामुळे महसूल विभागातील कामांना वेग येणार आहे. हवेली तालुक्यात सध्या खेड शिवापूर, खडकवासला, कोथरूड, हडपसर, वाघोली, थेऊर, उरुळी कांचन आणि कळस अशी आठ मंडल कार्यालये आहेत. याव्यतिरिक्त खानापूर-डोणजे, धायरी, आंबेगाव बुद्रुक, कात्रज, कोंढवा, महंमदवाडी, उरुळी देवाची, फुरसुंगी, खराडी, कोंढवे-धावडे, शिवणे, लोणी काळभोर, अष्टापूर, लोणीकंद अशी 15 मंडल कार्यालये नव्याने झाली आहेत. पूर्वीच्या मंडल कार्यालयांतून नवीन मंडल कार्यालयांची गावे वाटप केली आहेत. नवीन मंडल कार्यालयांमध्ये मंडल अधिकार्यांच्या नेमणुका केल्या आहेत. नवीन मंडल कार्यालयानुसार त्यांचे स्वतंत्रपणे दप्तर तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच मंडल कार्यालय असणार्या गावातच कार्यालयासाठी जागा शोधली जात आहे. यातील अनेक नवीन कार्यालये सुरु झाली आहेत तर काही नागरिकांसाठी आठ दिवसांत सुरू होतील. कार्यालयनिहाय अधिकारी मंडल कार्यालय – अधिकार्याचे नाव – समाविष्ट सजा/भाग वाघोली – अशोक शिंदे – आव्हाळवाडी, केसनंद, बिवरी, वाघोली उत्तर, वाघोली दक्षिण, वाडेबोल्हाई लोणीकंद – संदीप झिंगाडे – डोंगरगाव, पेरणे, फुलगाव, बकोरी, बुर्केगाव, भावडी, लोणीकंद अष्टापूर – गीताश्री काळे – अष्टापूर, खामगाव टेक, नायगाव, न्हावी सांडस, शिंदेवाडी खराडी – संदीप शिंदे – खराडी 2, खराडी 1, मांजरी खुर्द, वडगावशेरी 2, वडगावशेरी 1 कळस – सत्यवान लांडगे – कळस, धानोरी 1, धानोरी 2, लोहगाव, वडगाव शिंदे, विमाननगर लोणी काळभोर – नूरजहाँ सय्यद – आळंदी म्हातोबा, कदमवाकवस्ती, तरडे, लोणी काळभोर, सिद्राम मळा उरुळी कांचन – नूरजहाँ सय्यद – उरुळी कांचन, उरुळी कांचन दत्तवाडी, कोरेगाव मूळ, शिंदवणे, सोरतापवाडी थेऊर – जयश्री कवडे – कुंजीरवाडी, कोलवडी, थेऊर, महादेवनगर मांजरी बुद्रुक, मांजरी बुद्रुक 1, मोरेवस्ती मांजरी बुद्रुक