पुणे जिल्हा : सासवड आगारातून एकही एसटी धावली नाही

सासवड : महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाला सासवड आगारातून 100 टक्के प्रतिसाद मिळत असून पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागातील एसटी सेवा ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल पहावयास मिळाले त्याचबरोबर शालेय विद्यार्थी ताटकळत उभे असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.
कर्मचार्यांना सातवा वेतन अयोगासह राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाणे वेतनासाठी एसटी कर्मचार्यांनी मंगळवार सकाळपासून आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे सासवड एसटी आगार बंद आहेत.यामुळे एसटीच्या वाहतुकीला तालुक्यात फटका बसल्ल्याने प्रवाशाचे हाल होत आहेत.
एस.टी. मधील 11 कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनामुळे मंगळवारी (दि. 3) सकाळी 8 वाजेपर्यंत 251 आगारापैकी 35 आगार पुर्णतः बंद आहेत. बाकीचे आगार अंशतः अथवा पुर्णतः सुरू होते. पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती, तळेगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. यामुळे गणेशोत्सवासाठी एसटीने सुरु असलेल्या जादा वाहतुकीला फटका बसला आहे.





