पुणे जिल्हा :आळंदीत मंगळवारपासून वाहनांना नो एन्ट्री

प्रस्थान सोहळ्यानिमित्त 30 जूनपर्यंत वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली
आळंदी – श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्याचे 29 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. प्रस्थानानंतर पहिला मुक्काम आळंदी येथेच असून 30 जून रोजी पालखी सोहळा पुणे मुक्कामाकडे मार्गस्थ होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी भाविक तीर्थक्षेत्र आळंदी येथे दाखल होतात. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस वाहतूक विभागाकडून अत्यावश्यक आणि दिंडीची वाहने वगळून इतर वाहनांसाठी मंगळवारी (दि. 25) दुपारी 12 पासून ते रविवार (दि. 30) रात्री 9 वाजेपर्यंत आळंदी परिसरातील वाहतूक वळवण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिली.
दिघी-आळंदी वाहतूक विभागातील बदल
बंद मार्ग – चिंबळी फाटा चौक, चाकण येथून आळंदीकडे येणारी वाहने आणि आळंदी फाटा-चाकण येथून आळंदीकडे येणारी वाहने
पर्यायी मार्ग – जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे तसेच भोसरी चौकातून मॅगझीन चौक मार्गे जाता येईल.
बंद मार्ग – चाकण-वडगाव घेनंद शेलपिंपळगाव मार्गे आळंदीकडे येणारी वाहने
पर्यायी मार्ग – कोयाळी कमान, कोयाळी मरकळगाव मार्गे जातील
बंद मार्ग – मरकळकडून धानोरे फाटा मार्गे आळंदीकडे येणारी वाहने
पर्यायी मार्ग – धानोरे फाटा – च-होली फाटा – मॅगझीन चौक / अलंकापुरम चौक मार्गे जातील
बंद मार्ग – भारतमाता चौक, मोशी, मोशी चौक येथून आळंदीकडे येणारी वाहने
पर्यायी मार्ग – जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे, भोसरी चौकातून मॅगझीन चौक, मोशी-चाकण-शिक्रापूर मार्गे जातील
बंद मार्ग – पुणे-दिघी मॅगझीन चौकाकडून आळंदीकडे येणारी वाहने
पर्यायी मार्ग – भोसरी-मोशी-चाकण, च-होली फाटा-कोयाळी, शेलपिंपळगाव आणि अलंकापुरम-जय गणेश साम्राज्य चौक मार्गे जातील.
सर्वप्रकारच्या वाननांसाठी बंद असणारे मार्ग –
पुण्याकडून आळंदीकडे येणार्या वाहनांना चर्होली फाटा चौकाच्या पुढे जाण्यास
मोशीकडून आळंदीकडे येणार्या वाहनांना डुडुळगाव जकात नाक्याच्या पुढे जाण्यास
चिंबळीकडून आळंदीकडे येणार्या वाहनांना केळगाव चौक/बापदेव चौकाचे पुढे जाण्यास
चाकणकडून आळंदीकडे येणार्या वाहनांना इंद्रायणी हॉस्पीटलचे पुढे जाण्यास
वडगाव घेणंदकदून आळंदीकडे येणार्या वाहनांना विश्रांतवडचे पुढे जाण्यास
मरकळकडून आळंदीकडे येणार्या वाहनांना धानोरी फाटा/पीसीएस चौकाच्यापुढे जाण्यास





