पुणे जिल्हा : शिवरायांच्या विचारांतून राष्ट्रीय भावना जिवंत

श्रीमंत शिवाजीराजे भोसले ः पुण्यातील पहिल्या राष्ट्रीय मावळा परिषदेत मानवंदना
खडकवासला – जय शिवराय च्या जय घोषात, मर्दानी खेळांच्या गजरात पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राष्ट्रीय मावळा परिषदेत शेकडो देशवासीयांनी छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली.
शिवराज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्त मावळा जवान संघटनेच्या वतीने पुण्यातील पर्वती पायथा येथील साने गुरुजी स्मारक येथे रविवारी (दि. 1) परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तंजावर (तामिळनाडू) चे महाराज श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी आमदार भीमराव तापकीर होते. यावेळी इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे लिखित मराठी भाषेतील शिवचरित्राचे कृष्णकुमार गुप्ता यांनी अनुदानित केलेल्या द वर्ल्ड लिडर छत्रपती शिवाजी महाराज या इंग्रजी भाषेतील शिवचरित्राचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, राजाभाऊ पासलकर, माजी सनदी अधिकारी राजेंद्र चव्हाण, माजी पोलीस अधिकारी भारत निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, कर्नाटक क्षेत्रिय मराठा संघाचे अण्णाजीराव नलावडे,
अँड. नरसिंह लगड, सचिन पायगुडे, आंध्र प्रदेशच्या द्रविड विद्यापीठाचे प्राध्यापक विवेकानंद गोपाल, सुरेश मोहिते, प्रतापराव मरळ, रुपेश घुले, बाजीराव पारगे, सुरेश देसाई, लक्ष्मण माताळे, विजय तनपुरे आदी उपस्थित होते.





