Pune District: विमानतळाला राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या

सासवड : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जन्मभूमी असलेला पुरंदर तालुका आहे. याच तालुक्यामध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचे नाव घेण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे यांनी केली आहे.
सासवड (ता. पुरंदर) येथील शिवतीर्थ चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या संदर्भातील निवेदन पुरंदरचे नायब तहसीलदार संदीप पाटील यांनी स्वीकारले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष अंकुश जाधव, सल्लागार समितीचे अध्यक्ष गणपत शितकल, राज्याचे प्रवक्ते गंगाराम जाधव, विष्णू भोसले, नाना ताथवडकर, सोलापूरचे अध्यक्ष सुनील जाधव, राज्याचे उपाध्यक्ष गणेश खाडे, साहेबराव जाधव, अनिल विखे, सुहास काशीद, गंगुबाई नाईक, कैलास धिवार, यशवंत भांडवलकर, निलेश जाधव, लालासाहेब भंडलकर, किसन महाराज चव्हाण, अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.





