पुणे जिल्हा : समाज भूषण पुरस्काराने मुन्ना सोळंकी यांचा सन्मान

सासवड – पुरंदर तालुक्यातील सासवड येथील सकल जैन संघटनेच्या वतीने चैत्रशुद्ध त्रेयदशी भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दिगंबर जैन समाजाच्या वतीने मुन्ना सोळंकी यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. भगवान महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक जैन मंदिर ते कुंजीरवाड्या पर्यंत काढण्यात आली. यावेळी भगवान महावीर यांच्या बद्दल धनपाल पाटील, आशोक आंभुरे, विजय जैन, कल्याण सुराणा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. एकता कर्नावट यांनी आपले नृत्य सादर केले. विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे संघटनेच्या वतीने बक्षीस वितरण करण्यात आले.
हेमलता रमेश ओसवाल यांच्या वतीने कुंथुनाथ जैन मंदिरामध्ये पंचकल्याण पूजा करण्यात आली. मंगलदिवा आरती होऊन, स्वामी वात्सल्य झाले. यावेळी नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ईश्वर बागमार, बाबूशेठ सोळंकी, नितीन शहा, महेंद्र कर्नावट, निलेश ढाकले, चेतन ढाकले,
बाळासाहेब चोभे, कपिल ओसवाल, प्रशांत गिते, दादा नर्ते, संगीता कर्नावट, अर्चना परभणीकर, अनिता चोभे, सोनाली सुराणा, ज्योती कर्नावट, मिथाली मेहता आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कल्याण सुराणा यांनी तर गिरीश कर्नावट यांनी आभार मानले.





