पुणे जिल्हा : आळंदीत मुळशी तालुका वारकरी दिंडी सोहळा धर्मशाळेचे लोकार्पण

नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते उद्घाटन
पौड : मुळशी तालुका वारकरी दिंडी सोहळा नवीन धर्मशाळाचे उद्घाटन श्री क्षेत्र आळंदी येथे नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मांडेकर यांच्या हस्ते डॉ. हभप नारायण जाधव यांचे पूजन केले.
मुळशी तालुक्यावर असणारे प्रेम व वारकरी संप्रदाय वरती आलेले श्रद्धा असलेले नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांनी आवर्जून वेळ काढून उपस्थिती लावली असल्यामुळे वारकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मुळशी तालुका वारकरी दिंडी सोहळा नवीन धर्मशाळाचे उद्घाटन निमित्त पुढील काही दिवस नवीन धर्मशाळेत विविध धार्मिक कार्यक्रम पुढील प्रमाणे होणार असून त्याची सुरवात मंगळवारी (दि. 26) सकाळी 10 वा. नगर प्रदक्षिणा,
सायंकाळी 4 ते 5 प्रवचन सेवा सायंकाळी 5 ते 7 हरीपाठ रात्री 10 वाजता हरीजागर सायंकाळी 7 ते 9 किर्तन हभप दशरथ महाराज बेंगरे कार्तिक कृ. 12 बुधवार (दि. 27) सकाळी 10 ते 12 वा. विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सायंकाळी 5 ते 7 हरीपाठ रात्री 10 हरीजागर, सायंकाळी 7 ते 9 किर्तन हभप गणेश महाराज कारले, दि. 28 रोजी सकाळी 10 ते 12 किर्तन समाधी सोहळ्यानिमित्त ह. भ. प. तात्याबा महाराज बोरकर यांचे सुश्राव्य किर्तन होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
या कार्यक्रमाला शांतीब्रम्ह हभप मारुतीबाबा कुर्हेकर (जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था), आमदार शंकर मांडेकर, डॉ. नारायण महाराज जाधव (बाबा), शांताराम (दादा) बाजीराव इंगवले, संस्थापक मुळशी तालुका वारकरी दिंडी संस्थेचे तात्याबा महाराज बोरकर, अध्यक्ष शिवाजी महाराज हगवळे, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
उद्घाटन प्रसंगी मुळशी तालुका वारकरी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष शिवाजी हगवणे, दिंडी चालक एकनाथ दातीर, शांताराम इंगवले, बाबाजी शेळके, तात्या देवकर सर्व पदाधिकारी व वारकरी उपस्थित होते.





