Pune District : खासदार सुप्रिया सुळे यांनी केली चाले पुलाची पाहणी

कामाची गुणवत्ता राखण्याच्या सूचना
पौड : पौड- कोळवण- काशिग रस्त्यावरील चाले येथील पुलाचे काम संथ गतीने सुरू आहेफ पावसाळा सुरु झाला तरीही काम पूर्ण झाले नाही हहच बाब विचारात घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चाले येथील पुलाच्या कामाची पाहणी केली.
येथे काम करणार्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांकडून पुलाच्या कामाच्या सध्यस्थितीबाबत आढावा घेतला आतापर्यंत झालेले पुलाचे काम गुणवत्तापूर्ण केले आहे का व उर्वरित राहिलेले काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करुन येथील वाहतूक पूर्ववत करावी व उर्वरित कामाही गुणवत्तेचे व्हावे, अशा सूचना केल्या आहेत. या वेळी विविध गावांतील सरपंच यांनी विकास कामांबाबत निवेदनांची पत्र देखील सुळे यांना दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, नारायण साठे, भरत सातपुते, दत्तात्रय टेमघरे, साईदास शिंदे, निलेश फाले, ज्ञानेश्वर डफळ, राजू फाले, समीर दुडे, ज्ञानेश्वर आखाडे, चंद्रकांत दुर्गे, नवनाथ पालकर, गौरी भरतवंश, सरपंच धनश्री पालकर, सरपंच अरुणा केदारी, सीमा दहिभाते सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विनय जाधव व कोळवण खोर्यातील विविध गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.
चाले येथील पुलाचे काम बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करुन वाहतूक पूर्ववत करावी व नागरिकांना दिलासा द्यावा म्हणून संबंधितांना योग्य त्या सुचना केल्या आहेत.
-सुप्रिया सुळे, खासदार बारामती
चाले येथील पुलाचे काम पावसाने साथ दिल्यास म्हणजे पाऊस आला नाही तर 25 जून पर्यंत पूर्ण करुन वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
-विनय जाधव, शाखा अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग मुळशी)





