पुणे जिल्हा : आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

इंदापूर – जवळपास दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर,सर्वत्र शाळेची घंटा वाजली असून, शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांची किलबील पुन्हा एकदा घुमायला चालू झाली आहे. याच निमित्ताने माजी मंत्री व आमदार दत्तात्रेय भरणे यांनी इंदापूर शहरातील सरस्वती नगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला सदिच्छा भेट देऊन शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
आमदार भरणे यांनी सकाळी सात वाजल्यापासूनच इंदापूर शहरामध्ये प्रशासकीय बैठकांना उपस्थित राहत विविध विभागांचा आढावा घेतला. यामध्ये क्रीडा संकूलला भेट देऊन खेळाडूंबरोबर संवाद साधुन त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या.
त्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची आढावा बैठक घेतली.तसेच टंचाई आढावा व समन्वय समितीची ही बैठक घेऊन त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला अनेक मुद्द्यांवर सूचना केल्या आहेत.
तसेच सरस्वतीनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला सदिच्छा भेट देऊन शालेय विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केलेे.





