Pune District : हरवलेली मुलगी आईच्या स्वाधीन

रांजणगाव गणपती : रांजणगाव मधून वडीलांशी घरात किरकोळ वाद झाल्याने रागाच्या भरात 12 वर्षीय आशियाना वहीद अन्सारी ही मुलगी गुरुवारी (दि. 23) सकाळी 10च्या दरम्यान घर सोडून निघून गेली होती. तीचा शोध घेऊन ती दुपारपर्यंत घरी परत न आल्याने तिच्या आईने रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार दिली.
दरम्यान, रांजणगाव पोलिसांची कर्तव्यदक्षतेने हरवलेली मुलती आईच्या स्वाधीन करण्यात आल्याने पोलिसांची एक वेगळीच चुणूक दिसून आली. संबंधित मुलीचा शोध घेण्या कामी तात्काळ तीन पथके नेमण्यात आली होती. त्या आईच्या मातृत्वाचे दु:ख पाहून पोलीस कॉस्टेबल गणेश वाघ यांनी आपली कर्तव्यदक्षता दाखवून नेटवर्कच्या माध्यमातून तत्परतेने पुणे ग्रामीण व पुणे शहर हद्दीतील आजूबाजूच्या सर्व पोलीस स्टेशनला तात्काळ फोन केले असता येरवडा पोलीस ठाणे येथे ही मुलगी असल्याची माहिती प्राप्त झाली.
सहायक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण यांनी कार्यतत्पर राहून कर्तव्याशी प्रामाणिक असलेले पोलीस हवालदार संदीप जगदाळे व पोलीस कॉन्टेबल महिला चालक शुभांगी लबडे यांना येरवडा पोलीस ठाण्यत मुलीला घेऊन येणे कामी तात्काळ रवाना केले. ठाणे अंमलदार मदतनीस पोलीस कॉस्टेबल अजित पवार, अंमलदार जागृती मचिंदर, वायरलेस अंमलदार निशा हुंडेकर यांनी मुलीच्या आईस धीर दिला.
कर्तव्यदक्षतेची आणखी एक वेगळी चुणूक म्हणजे नाईट राऊंड पोलीस उपनिरीक्षक पासलकर व चालक पो. हवा माऊली शिंदे यांनी नाईट राऊंडला रवाना होण्याऐवजी या मुलीचा शोध घेणेकामी सर्व परिसर पिंजून काढला होता.





