पुणे जिल्हा : मंत्र्यांच्या प्रतिमेला काळे फासले

पिंपरखेड येथे मराठा समाज आक्रमक : जोरदार घोषणाबाजी
जांबूत – शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे मराठा समा बांधवांनी सरकारकडून आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेतली जात नसल्याने सोमवार (दि.30) आक्रमक होत एस टी बसच्या जाहिरातीवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला काळे फासत जोरदार घोषणाबाजी केली.
पिंपरखेड येथे मोठ्या संख्येने समाज बांधव एकवटले असून राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावबंदी करून दोन दिवसापासून साखळी उपोषणाला सुर आहे.
गावात बसथांब्यावर साखळी उपोषण स्थळी एसटी महामंडळाची एस टी बस आलेली असताना बांधवांनी आक्रमक होत एक जोरदार घोषणाबाजी करीत एसटी बसवर असलेल्या जाहिरातमधील पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिमेला काळे फासले. यावेळी सरपंच राजेंद्र दाभाडे, माऊली ढोमे, नरेंद्र बोंबे, हेमंत नरवडे, शरद बोंबे,
सत्यवान पोखरकर, लक्ष्मण गायकवाड, दिलीप उदागे, जयवंत बोंबे, शांताराम वरे, बाळासाहेब बोंबे, विश्वास वरे, बांधव उपस्थित होते.
स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सहभाग
शिरूर तालुक्यात मराठा आरक्षणासाठी मराठा समाज बांधव हा आक्रमक झाला आहे. गावागावांत साखळी उपोषण सुरू झाले आहे. सर्व स्तरातून घटकांचा पाठिंबा मिळत आहे. सर्वपक्षीय नेत्यांचा सहंभाग असल्याने स्थानिक पदाधिकारी आंदोलनात सहभागी होत आहेत.





