Pune District : वैष्णवांना औषधोपचार सेवा

सासवड – आषाढी पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर हजारो वारकरी भक्त भक्तिभावाने विठ्ठलनामाचा जयघोष करत पुढे सरकत आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा दोन दिवसीय सासवड मुक्कामी होता.
सासवड (ता. पुरंदर) येथे वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने संत साहित्याचे गाढे अभ्यासक स्व. सदानंद महाराज आळंदीकर गुरुजी यांच्या स्मरणार्थ 2500 पेक्षा जास्त वारकर्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना प्राथमिक औषधोपचार तसेच फराळ वाटप करण्यात आले.
साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्ती प्रमाणे गेली अनेक वर्षे सात्यत्य ठेऊन आमच्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे .या माध्यमातून वारकर्यांना जवळपास एक लाख रुपयांची औषधे व 50 हजार रुपयांच्या फराळ साहित्याचे वाटप करण्यात आले. ही वारी हे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकात्मतेचे प्रतीक आहे.
वारकर्यांची सेवा हाच आमचा खरा धर्म मानून हा उपक्रम गेली अनेक वर्षे हाती घेतला आहे. या सेवेमुळे अनेक वारकर्यांना दिलासा मिळाला आसे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालींदर कामठे यांनी सांगितले.
यावेळी नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भानुकाका जगताप, सचिन पठारे, शिवाजी साळुंके, नवनाथ बोरावके, बंडू पवार आदी मान्यवर उपस्थित होते. वारकरी आरोग्य तपासणी शिबिरासाठी डॉ. मनोज अहिरे, डॉ.चंद्रशेखर अहिरे, डॉ. नीरज नागर, डॉ. गोपाल झवर, डॉ. संकेत लोलगे व मित्रपरिवार यांचे विशेष सहकार्य लाभले.





