पुणे जिल्हा : माऊली कटके सोसायटीधारकांसाठी नेहमीच धावले

वाघोली परिसरातील सोसायटी सभासदांशी साधला संवाद
वाघोली – रस्ते असतील, पाणीसमस्या असेल यासाठी माऊली कटके यांनी आम्हा सोसायटीधारकांना नेहमीच मदतीची भूमिका घेतली आहे. मॉली कटके हे आपल्यातीलच असल्याने त्यांना सोसायट्यांमध्ये असलेल्या समस्यांची जाण आहे. पदावर असो किंवा नसो त्यांनी या समस्या सोडविण्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. येणार्या काळात आपलाच माणूस विधानसभेत गेला तर या समस्याच राहणार नाहीत असे गौरवाद्गार वाघोली परिसरातील सोसायटीधारकांनी काढले.
महायुतीचे शियर-हवेली मतदारसंघातील राश्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांनी वाघोली परिसरातील सुयोग निसर्ग, ग्रीन पब्लिक, विजय विहार, प्रायमेरा होम, अल्फा होम, गंगा मार्बल फ्रिया, क्रिसालिस रो हाऊस, तेजस्वीनी महिला संस्था, स्प्लेंडर काऊंटी, स्प्लेंडर रो हाऊस,
ओझोन अपार्टमेंट, ओझोन रो हाऊस, स्प्लेंडर पार्क, इमरल्ड आयसिल, इमरल्ड रो हाऊस, मिडोज मिस्टीक रो हाऊस, वाघेश्वरनगरमधील धोका बिल्डिंग आदी सोसायटीमधील सभासद, पदाधिकारी आणि मतदारांशी संवाद साधला. यावेळी सोसायटीतील पदाधिकार्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी माऊली कटके यांनीही आपण नेहमीच सोसाटीधारकांच्या पाठीशी राहून त्यांच्या समस्या या स्वतःच्या समस्या समजून सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी शिरूर-हवेली मतदारसंघातील महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट), आरपीआय, रयत क्रांती संघटना यांसह मित्र पक्षाचे पदाधिकारी, कायकर्ते व स्थानिक पदाधिकारी, महिलावर्ग, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.





