Pune District : वाटाण्याचे बाजारभाव कडाडले

फ्लॉवरची विक्रमी आवक, बाजारभावात घसरण
मंचर – कृषि उत्पन्न बाजार समिती मंचर ता. आंबेगाव येथे रविवार दि. 15 रोजी तरकारी शेतमालाची एकुण 10 हजार 824 डाग इतकी आवक झाली. वाटाणा या शेतमालाला दहा किलोला 1 हजार 200 रुपये असा विक्रमी बाजार भाव मिळाला. अशी माहिती बाजार समितीचे सभापती निलेश (स्वामी) थोरात यांनी दिली.
मंचर कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध प्रकारची तरकारी आंबेगांव, खेड, जुन्नर, पारनेर, शिरुर या भागातुन मोठया प्रमाणांवर शेतकरी तरकारी या शेतमालाची आवक विक्रीसाठी घेऊन येत असतात. मंचर बाजार समितीचे वैशिष्ट्य म्हणजे तरकारी शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर शेतक-यांना शेतमालाचे वजन, बाजारभाव व एकूण रक्कम याचा एसएमएस मोबाईल अॅपव्दारे त्यांच्या मोबाईलवर लगेच कळतो. ही विश्वासार्हता शेतक-यांना असल्याने पाच तालुक्यांतुन शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन येतात. असे उपसभापती सचिन पानसरे यांनी सांगितले.
मंचर बाजार समितीमध्ये तरकारी या शेतमालाल 10 किलोला पुढीलप्रमाणे बाजारभाव मिळाला. कंसांत मालाची आवक दर्शविली आहे. कारले (418) 200-480, गवार (518) 500-1000, घेवडा (49) 300-850, चवळी (190)-250-400, ढोबळी मिरची (195) 300-650, भेंडी (214) 250-355, फरशी (3) 300-700, प्लॉवर-(5181)50-100, भुईमुगशेंगा (285) 300-570, दोडका (50) 300-600, मिरची (596) 250-500, तोंडली-(101)-200-350, शेवगा (4)-450-625,
लिंबु (5)-200-400, काकडी-(1049)150-200, कोबी (237) 100-150, वांगी (175) 200-400, दुधीभोपळा- (111)150-330, पावटा (5) 900, बीट-(456) 120-320, बटाटा-(2) 150, आले (20)-300, गाजर (22)150-200, घोसाळी (18)100-150, टोमॅटो (104) 200-450, मका (461)100-165. कैरी-(152)200-400, फणस (2)-200, पापडी (2)-650, लसुन (2)-810, डांगरभोपळा (16)-120, आघोरा (4)-140, वाटाणा-(2)1000-1200 वरीलप्रमाणे तरकारी या शेतमालाला बाजारभाव मिळाला.





