पुणे जिल्हा : सहकार मंत्र्यांच्या मध्यस्थीने मंचरला उपोषण सोडले

मंचर – सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सहकार विभागातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांमार्फत मंचर येथील संत ज्ञानेश्वर पतसंस्थेच्या विरोधात उपोषणकर्त्यांच्या मागणी संदर्भात चौकशी करण्याचे आदेश सहकार विभागाला शनिवार, दि. १४ रोजी दिले. त्या नंतर उपोषणकर्त्यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते जलपान घेउन उपोषण सोडले.
मंचर प्रांत कार्यालयाजवळ सात उपोषणकर्त्यांनी मंचर येथील संत ज्ञानेश्वर पतसंस्थेच्या वतीने आमच्यावर कर्ज घेतल्याचा केलेला आरोप मान्य नसल्याचे सांगून गेल्या अठरा दिवसांपासून सात व्यक्तीने उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेण्यासाठी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील,
शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणाकर्त्यांचे म्हणणे समजून घेत थेट सहकार आयुक्त यांना फोन लावून या प्रकरणाची चौकशी करावी, असे आदेश दिले.
त्यानुसार सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अश्वस्थ केल्याने उपोषणकर्त्यांना मागणी मान्य झाल्याने त्यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते जलपान घेऊन उपोषण सोडत असल्याचे जाहीर केले. यावेळी सहाय्यक निबंधक आंबेगावचे विठ्ठल सूर्यवंशी यांनी उपोषणकर्त्यांची बाजू समजावून घेत योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.





