पुणे जिल्हा : प्रलंबित मागण्यांबाबत मंचर एसटी आगार कर्मचारी बेमुदत संपावर

मंचर : एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी पुकारलेल्या संपाला पाठिंबा म्हणून मंचर एसटी आगार कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रलंबित मागण्यांबाबत घोषणाबाजी मंगळवार, दि. ३ रोजी केली. कर्मचारी बेमुदत संपावर गेले असून एसटी सेवा ठप्प झाली आहे, अशी माहिती संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष रामचंद्र गेगजे, सचिव मोहम्मद सलील सय्यद यांनी दिली.
एसटी महामंडळाचे मंचर आगाराचे वाहक राजू बन्सी आणि संघटनेचे सचिव मोहम्मद सलील सय्यद यांनी एसटी कर्मचाऱ्र्यांच्या प्रमुख मागण्या सांगितले की, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सरकारने सातवा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांना लागू करावा. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वेतनवाढीच्या दराची थकबाकी त्वरित अदा करा.४८४९ कोटी रुपये मधील
उर्वरित रक्कम त्वरित अदा करा.मुळवेतनात दिलेल्या ५ हजार रुपये, ४ हजार रुपये ,२ हजार ५०० रुपयांमुळे झालेल्या विसंगती दूर करण्यासाठी सरसकट ५ हजार रुपये द्या.एस.टी. कर्मचारी व कुटुंबियांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा (इनडोअर व आऊटडोअर) त्वरित सुरू करा.सुधारित जुल्मी शिस्त व आवेदन कार्यपद्धतीमध्ये त्वरित बदल करा.विद्यमान एस.टी. कर्मचारी व त्यांच्या कुटूंबीयांना तसेच सेवानिवृतांना व त्यांच्या पत्नीस सर्व प्रकारच्या बसेसमध्ये फरक न भरता वर्षभराचा मोफत पास द्यावा.इत्यादी मागण्यासाठी एसटी कर्मचारी संपावर गेल्यावर एसटी वाहतूक सेवा ठप्प झाली आहे.





