Pune District : मिळालेल्या संधीचे सोने करा; अशोक टेकवडे : स्पर्धा परीक्षेतील यशस्वीतांचा सन्मान

सासवड : समाजामध्ये अनेक चांगले काम करणारे व्यक्ती आहेत. समाजातील सर्वसामान्य माणसाला मदत करण्याची भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाऊन काम करणारी ही संघटना आहे. आपण मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. अधिकारी म्हणून आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करून या संघटनेने घेतलेल्या सत्काराची आठवण ठेवणे गरजेचे आहे.
स्व. चंद्रकांत टिळेकर यांनी हयातभर समाजासाठी काम केले, असे प्रतिपादन पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी केले.
सासवड (ता. पुरंदर) येथील गुरुकुल अकॅडमीमध्ये अठरापगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तुंग यश संपादन केलेल्या अधिकाऱ्यांचा रेडिओ सिटी 91.1 चे आरजे केदार यांच्या हस्ते सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी लोकसेवा आयोगातून निवड झालेले परिवहन अधिकारी अंकिता वांढेकर, पोलीस उपनिरीक्षक शैलेश लवांडे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ तांबे, डायरेक्ट बायोटेक्नॉलॉजी पीएचडी अंबिका दिवसे शिंदे, सहाय्यक संचालक वित्त व लेखा अधिकारी राजेश नलवडे, गणित परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेली वेलिका कांबळे, एसएससी परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक आलेला विद्यार्थी सार्थक गजरे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी रेडिओ सिटीचे आर जे केदार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संभाजी दुधमल, गणेश लोणकर, अरुणा बोबडे, सारिका गुरव, हसीन अत्तर, अरमान बागवान, अमोल बनकर यांना आरजे केदार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी दत्ता सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा जगताप, सुभाष सूर्यवंशी, पंकज धिवार, संदीप राऊत, विजय वढणे, चंदन मेमाणे, गंगाराम माने, अमोल भुजबळ, निता सुभागडे, ॲड. अर्चना भैरवकर, राणी भांडवलकर, मयुरी जरांडे, बाळासाहेब पवार, हरून बागवान, आरिफ अत्तार उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अठरापगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर, मंगेश गायकवाड, सुजाता गुरव, राजेंद्र धोत्रे अतुल पवार, इजाज पानसरे, राहुल भोडे, प्रतीक भांडवलकर, समीर भिंगारदिवे, साहिल चौरे, विश्वनाथ गायकवाड, येशू जाधव, सचिन वढणे, समीर बागवान, महेश दिवेकर, प्रकाश मांडके उपस्थित होते. मंगेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सुजाता गुरव यांनी केले. राजेंद्र धोत्रे यांनी आभार मानले.





