पुणे जिल्हा : वाल्हे गावात महायुतीचा जल्लोष

जंगी मिरवणुकीत घोषणबाजी
वाल्हे – पुरंदर- हवेली मतदारसंघावर पुन्हा एकदा भगवा फडकला असून पुरंदर- हवेली मतदार तिरंगी लढतीचा फायदा विजय शिवतारे यांनाच झाला.
२४१८८ मतांच्या फरकाने विजय शिवतारे यांनी प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे संजय जगताप यांचा पराभव करून गेल्या निवडणूकीतील पराभवाचा वचपा काढला. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जंगी विजयी मिरवणूक वाल्हे (ता. पुरंदर) येथे काढण्यात आली होती. यादरम्यान, महायुतीतील कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला.
यावेळी महायुतीतील कार्यकर्त्यांनी बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून गुलालाची मुक्त उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जंगी मिरवणूक काढली. फटाक्यांची आतिषबाजी करत घोषणा देत कार्यकर्त्यांनी संपूर्ण बाजारपेठ दणाणून सोडला होता. ग्रामदैवतेचे दर्शन घेऊन कार्यकर्त्यांनी घरोघरी गाठी भेटी घेत लाडक्या बहिणीचे आभार देखील मानले.
याप्रसंगी भाजपचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते, उद्योजक राहुल यादव, सागर भुजबळ, प्रदीप चव्हाण, माजी उपसरपंच अमित पवार, सुकलवाडीचे माजी उपसरपंच अमित पवार, उद्योजक अथर्व पवार, अरुण पवार, संतोष गायकवाड, विकास पवार, उमेश पवार, राजकुमार यादव, सचिन दोषी, पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.





