पुणे जिल्हा : महायुतीचे उमेदवार बेनकेंचा गावोगावी प्रचार

ग्रामस्थांकडून प्रतिसाद : पुष्पवृष्टीत केले जातेय स्वागत
बेल्हे – जुन्नर तालुका विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार (राष्ट्रवादी काँग्रेस) तथा आमदार अतुल बेनके यांच्या निवडणूक प्रचारास गावोगावी ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
बेनके यांनी रविवारी (दि.10) बेल्हे, तांबेवाडी, रानमळा, झापवाडी, मंगरूळ, पिंपरी कावळ, पारगाव तर्फे आळे, औरंगपूर, साकोरी, निमगावसावा, साळवाडी गावांना भेटी देऊन प्रचार केला. यावेळी फुलांची पुष्पवृष्टी, सवाद्य प्रचार रॅली, गाव बैठका, कोपरा सभा, पारावरच्या सभा घेऊन जुन्नर तालुक्याचा केलेला विकास व भविष्यातील योजना यावर मतदारांशी संवाद साधला. बेनके यांच्या प्रचारात जुन्नर तालुक्याचा केलेला विकास व त्यांच्या संयमी स्वभावाची कार्यकर्त्यांना भुरळ पडली आहे.
यावेळी जुन्नर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार, तांबेवाडी माजी सरपंच तान्हाजी कुंजीर, सरपंच संगीता कुंजीर, उपसरपंच बाजीराव शेठ कुंजीर, दादाभाऊ गुंजाळ, संजय तिकोने, संतोष गुंजाळ, राजेश गुंजाळ, सुरेश गुंजाळ, रोहिदास पाडेकर, बाळासाहेब खिल्लारी, ताराबाई लामखडे, नानाभाऊ नवले, दत्ता लामखडे, निलेश लामखडे, दत्तू खराडे, भाऊ कोरडे, देवराम खराडे, चंद्रकांत नायकोडी, गोरक्ष नवले, बाळासाहेब खिल्लारी, संभाजी चव्हाण, शिवाजी शिरतार, सिद्धार्थ शिंदे, फकीरा पाबळे, प्रकाश भांबेरे, गणेश पाबळे, सुवर्णा पाबळे, ज्ञानेश्वर पाबळे, कचर चक्कर, रामभाऊ चक्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
मतदारांमध्ये रंगलेली चर्चा
जुन्नर तालुक्यातील पाण्याचे सुयोग्य नियोजन, पर्यटन, बिबट समस्या, माझी लाडकी बहीण योजना, वीज बिल माफी, भेदभाव न करता निधीचे वाटप, शांत व संयमी स्वभाव, सर्वांना बरोबर घेऊन जाणे, आमदारकीचा बडेजाव न करता जमिनीवर राहून सर्वसामान्यांची चौकशी करणे, आपल्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीची प्रेमाने चौकशी करणे, कुटुंबातील सदस्यांची वैचारिक भूमिका, विरोधाची भूमिका न घेता विकासकामे करणे, आंदोलने करण्यापेक्षा लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश्न मार्गी लावणे, प्रशासकीय अधिकार्यांशी समजूतदारपणे बोलणे असे विविध चांगले गुण त्यांनी जपल्यामुळे त्याची चर्चा प्रचार दौर्यात मतदार करीत आहेत.





