उरुळी कांचन : जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पेहलगावजवळ बायसरन गार्डनमध्ये मंगळवारी (दि. 22) झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 27 देशवासियांचा बळी गेला. या पर्यटनस्थळी दहा मिनिटांत पोहण्याचा तयारीत असलेल्या उरुळी कांचन, दौंड व शिरूरमधील पर्यटकांचा जीव घटनास्थळी जाण्यास दहा मिनिटांचा वेळ लागण्यापूर्वी घटना घडल्याने 70 स्थानिक पर्यटकांचा जीव बारंबार वाचला आहे. उरुळीकांचन स्थित मेलडी टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडून सुमारे 70 प्रवासी या पर्यटनस्थळी जाणारे होते. त्यापूर्वीच ही घटना घडल्याने हे पर्यटक माघारी फिरले आहे. दरम्यान या पर्यटकांनी -हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटकेंशी संपर्क साधला असून कटके यांनी त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी विमानाची व्यवस्था करणार असल्याची माहिती दिली आहे. उरुळी कांचन येथील मेलेडी टूर्स व ट्रॅव्हल्सकडून आयोजित जम्मू कश्मीरच्या सहलीसाठी उरुळी कांचन, आळंदी म्हातोबा, दौंड व शिरुर तालुक्यातील एकूण 70 जन हे 15 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरला रवाना झाले आहेत. हल्ला झालेल्या घटनास्थळी असलेल्या बायसरन गार्डनला ते मंगळवारीच भेट देणार होते; परंतु ते घटनास्थळीवरुन अगदी एक किलोमीटर जवळील बायसरन पहाडीतून प्रवास करुन पर्यटनस्थळी पोहचण्याच्या दहा मिनिटांपूर्वी हा हल्ला झाल्याने ते बचावले आहेत. पेहलगामध्येच एका हॉटेलमध्ये मिळेल त्या ठिकाणी संपूर्ण रात्र काढली असून सकाळी त्यातीलच एका पर्यटकाने व्हिडिओ स्वरुपात राज्य सरकारला मदत मागितल्यानंतर या अडकलेल्या प्रवाशांबद्दल माहिती प्राप्त झाली आहे. या अडकलेल्या पर्यटकांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार सुनिल तटकरे यांच्याशी संपर्क साधून अडकलेल्या पर्यटकांना सोडविण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. बुधवार सकाळी हे पर्यटक कश्मीर पर्यंत पोहचले आहेत. त्यांनी स्थानिक प्रशासनाशी मदतीची मागणी केली आहे. हवेली, दौंड व शिरुर मधील अडकलेल्या पर्यटकांशी संपर्क सुरू आहे. हे सर्व पर्यटक सुखरूप असून त्यांना कश्मीर अथवा जम्मू मार्गे परतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे यांच्याशी संपूर्ण सुरू आहे. लवकरच त्यांना विमानाने पुण्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये. -ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, आमदार शिरूर-हवेली