पुणे जिल्हा : निमगाव सावात धुमाकूळ घालणार्या बिबट्या जेरबंद

बेल्हे – बागवाडी, निमगाव सावा (ता. जुन्नर) लक्ष्मण सावे यांच्या शेतात लावलेल्या पिंजर्यात शनिवार (दि. 1) पहाटे 5 वाजता बिबट जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.
हा बिबट नर असून वय 5-6 वर्षे आहे. या बिबट्यास माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे हलविण्यात आले असल्याची माहिती वनविभागाने दिली.
निमगाव सावा येथील बागवाडी, मते मळा, काटे वस्ती येथे बिबट्याची दहशत होती. दोन दिवसांपूर्वी गणपत नारायण गाडगे यांच्या घराजवळ पाच फुटाच्या जाळीवरून जाऊन दोन बकरे फस्त केली. ही महिती ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकार्यांना कळविले असता वनविभागाच्या अधिकार्यांनी या गोष्टीची ताबडतोब काळजी घेऊन पंचनामा केला.
वन विभागाच्या अधिकार्यांनी पिंजरा उपलब्ध करून दिला. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, वनपाल भानुदास शिंदे, वनरक्षक महेश जगधने यांनी ताबडतोब पिंजरा लावला असता अखेर वन विभागाच्या अधिकार्यांना पिंजर्यात बिबट्या पकडण्यात यश आले.





