Pune District : बारामतीची वकील संघटनेची विधायकता

पालखी सोहळ्यातील उपक्रमाने वारकरी भारावले
बारामती – जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळयाच्या निमित्ताने बारामती वकील संघटनेतर्फे पाटस रोड मधुबन हाॅटेल समोर स्टेज टाकून पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी सोहळ्यातील दिंडी प्रमुखांचे स्वागत करून वारकऱ्यांना २००० राजगिरा लाडू, बिस्कीट तसेच पाणी बाॅटल वाटप करून एक सामाजिक संदेश देण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रसाद खारतुडे, उपाध्यक्ष ॲड अनुप चौगुले, उपाध्यक्ष ॲड. हर्षदा सस्ते, सचिव ॲड. विजय कांबळे, सहसचिव ॲड. श्वेता वणवे, खजिनदार ॲड. संदीप बनसोडे, ग्रंथपाल ॲड. राम सूर्यवंशी, महिला प्रतिनिधी ॲड. मोनिका कोठावळे- निलाखे यांनी तसेच वकिल संघटनेचे सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी बारामती वकील संघटनेचे ज्येष्ठ कनिष्ठ विधीज्ञ महिला वकील भगिनी यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन स्वयंस्फूर्तीने आर्थिक स्वरूपात देणग्या देवून हिरीरीने मोठ्या प्रमाणावर वारकऱ्यांची सेवा केली. संघटनेचे अध्यक्ष ॲड प्रसाद खारतुडे आभार मानले.





