Pune District : अंगारक चतुर्थीला लाखो भाविकांनी घेतले विघ्नहराचे दर्शन

ओझर – अष्टविनायकांपैकी एक श्री क्षेत्र ओझर येथे पहाटे ४. वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे उपाध्यक्ष तुषार कवडे, सचिव सुनील घेगडे, खजिनदार दत्तात्रय कवडे, विश्वस्त विनायक मांडे, संतोष कवडे, प्रकाश मांडे, समीर मांडे, विनायक जाधव, गोविंद कवडे, विलास कवडे शिल्पाताई जगदाळे यांच्या शुभहस्ते श्रींना महाअभिषेक पूजा करून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.
मंदिरामध्ये अंगारिका चतुर्थी निमित्त देवस्थान ट्रस्टने गणेशयागाचे आयोजन केले होते. मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. महाआरतीचा मान ज्योतीताई मेटे, शेखर कानडे, अनिल पठारे, शीतल कदम, विनायक जठार, हेमंत जुईकर, रमेश जाधव, स्वप्नील पवार, जयेश घाडगे, लक्ष्मण विधाटे, प्रतिभा पाटील, अभिजित काजळे यांना मिळाला.
पहाटे पाच ते अकरा या वेळेत रांगेत सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले. सकाळी ८.०० वाजता नियमित पोथी वाचन करण्यात आले. सकाळी १०.३० वाजता श्रींना नैवद्य दाखवून ट्रस्टच्या वतीने भाविकांना खिचडी वाटप करण्यात आली. अंगारिकानिमित्त मंदिरात फुलांची आरस, विघ्नहराला रेशमी जरीचा पोशाख करण्यात आला होता. तसेच सोन्याचे अलंकार श्री विघ्नहराला परिधान करण्यात आले. येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरात दर्शनरांगेत पिण्याचे पाणी, देणगी कक्ष, अभिषेक करण्यासाठी शमी वृक्षाखाली व्यवस्था, दर्शन झाल्यानंतर विसाव्यासाठी विघ्नहर उद्यान, चप्पल स्टॅन्ड, पार्किंग, कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन व्यवस्था इत्यादी व्यवस्था करण्यात आली होती.
सायंकाळी ७.०० वा. नियमित हरिपाठ झाला, चंद्रोदयापर्यंत ओंकार महाराज मनसुख (खिल्लारवाडी) यांचे हरिकीर्तन झाले. राम प्रसादिक भजनी मंडळ शिरोली यांनी त्यांना साथसंगत केली. आजचे अन्नदाते लंबोदर भालचंद्र रवळे, ओझर यांनी अन्नदान केले. रात्रौ १०.३० वाजता शेजआरती करून ११.०० वाजता मंदिर बंद करण्यात आले. दानशूर व्यक्तीमत्व ज्योतीताई मेटे, शेखर कानडे, अनिल पठारे, विजय सातव, प्रचीती धुरी यांनी देवस्थानला देणगी दिली.
आज याच दिवशी उद्योजक सुरेंद्र वाधवा, हेमंत राजमाने, महेश गोरडे यांनी श्री विघ्नहराचे दर्शन घेतले. आलेल्या भाविकांचे स्वागत देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, सचिव सुनील घेगडे, खजिनदार दत्तात्रय कवडे, विश्वस्त प्रकाश मांडे, सुर्यकांत रवळे, गोविंद कवडे, विक्रम कवडे, समिर मांडे, विनायक मांडे, संतोष कवडे, विलास कवडे, विनायक जाधव, मंगेश पोखरकर, सौ.शिल्पा जगदाळे, यांनी केले. गर्दी व्यवस्थापन ट्रस्टचे व्यवस्थापक व कर्मचारी यांनी केले.





