मंचर – शालेय विद्यार्थिनींनी महिला शिक्षकांशी मनमोकळा संवाद साधून आपल्या आरोग्याबाबत किंवा कोणी काही त्रास देत असेल याबाबत माहिती दिल्यास उपाययोजना करण्यासाठी मंचर येथील सेवाभावी असणाऱ्या ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था पुढाकार घेईल,अशी माहिती ज्ञानशक्ती विकास वाहिनीच्या प्रशिक्षक संगीता थोरात यांनी दिली. लाखणगाव (ता.आंबेगाव) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ज्ञानशक्ती विकास वाहिनी स्वयंसेवी संस्था”आयोजित किशोरवयीन विद्यार्थिनी प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन संगीता थोरात व प्रणाली गायकवाड म्हणाल्या, विद्यार्थिनींना आरोग्य, स्वतःचे आरोग्य, विद्यार्थ्यांमध्ये होणारे बदल तसेच गुड टच-बॅड टच यांच्यातील फरक, एखादी आपत्ती आलीच तर त्यासाठी स्वतःची सुरक्षितता कशी करावी, यासाठी सर्व किशोरवयीन मुलींना विशेष मार्गदर्शन केले. ज्ञानशक्ती विकास वाहिनी स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापिका गार्गी विशाल काळे यांच्या शालेय विद्यार्थिनींबाबत मार्गदर्शन असल्याचे मुख्याध्यापक अनिल देसले यांनी सांगितले. कार्यक्रमप्रसंगी शिक्षिका कल्पना राजगुरू,रसिका शिंदे व प्रवीण शिकारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.