पुणे जिल्हा : किरण दगडे यांनी महिलांना योजनांचा लाभ दिला

पिरंगुट : महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला…बचतगटांना मदतीचा हात दिला…तर तरूणांना रोजगाराची संधी दिली. किरण दादाने गेल्या काही महिन्यांत एवढं काम केले. तर त्यांना आता आपण ताकद दिली तर मतदारसंघाच्या विकासाला गती मिळेल. त्यामुळे महिलांसह सर्वांनी दादांना साथ द्यायची वेळ आली. असे सांगत आम्ही किरण दगडे यांंच्या पाठीशी असल्याचा विश्वास महिलांसह ग्रामस्थांनी पदयात्रेदरम्यान गाव बैठकीत व्यक्त केला.
मुळशी तालुक्यातील भुगाव, भुकूम, उरवडे, कासार आंबोली, सुतारवाडी, पौड, चाले, मुगावडे, घोटावडे, भरे आणि पिरंगुट या परिसरातून काढलेल्या प्रचारफेरीत मुळशीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जेसीबीतून फुलांची उधळण आणि भव्यदिव्य हार घालण्यात आले. औक्षण करण्यासाठी महिलांची गर्दी झाली. यावेळी तरूणांची संख्या मोठी होती.
अपक्ष उमेदवार असूनही किरण दगडे यांच्या पदयात्रेला नागरिकांची होणारी गर्दी जनमत दर्शवत आहे. मंगळवारी (दि. 12) भोर तालुक्यातील दिवळे, हरिश्चंद्री, कापूरहोळ, निगडे, मोरवाडी, काळेवाडी, केंजळ, किकवी, सारोळे, पांडे, भोंगवली, न्हावी, वाटार हिंदे, गुणंद यासह अन्य गावांमध्ये पदरयात्रा पार पडली. यावेळी ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि किरण दादा…खरा माणूस, तुमची हाक आमची साथ असा घोषणा देत नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
ज्याच्या पाठीशी जनता त्याचा विजय निश्चित असतो. त्यामुळे भोर मतदारसंघात प्रस्थापितांना धक्का देत विजयाची गुढी उभारणार. मतदारसंघ राज्यात अग्रेसर बनवणार.
किरण दगडे पाटील – अपक्ष उमेदवार, भोर विधानसभा मतदारसंघ





