पुणे जिल्हा : चिंबळीत शिवलिंगावर साकारला खंडोबा अवतार

चिंबळी : येथील महादेव मंदिरात पाचव्या श्रावणी सोमवार व सोमवती अमावास्या निमित्त शिवलिंगावर अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा अवतार साकारण्यात आला होता.
चिंबळी ग्रामस्थांच्या सहकार्यातून गावातील अवघडे परिवाराच्या वतीने शिवलिंगावर आकर्षक मुखवटा व मंदिरात सुंदर पुष्पसजावट करण्यात आली होती. श्रावणी सोमवार निमित्त गेल्या चार ही सोमवारी अवघडे परिवाराच्या वतीने चिंबळी येथील महादेव मंदिरात आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली होती.
यामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीला श्रीकृष्ण अवतार त्याचप्रमाणे नारळी पौर्णिमेला आकर्षक पुष्प सजावट अशा सुंदर प्रतिकृती अवघडे परिवाराच्यावतीने महादेव चरणी अर्पण करण्यात आल्या होत्या. दरम्यान, शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने भाविकांनी येथील महादेव मंदिरात दर्शनासाठी गर्दी केल्याचे दिसून आले.
गाव परिसरात नोकरी, कामधंद्या निमित्त राहण्यास असलेल्या परजिल्ह्यातील, परराज्यातील व उत्तर भारतीय भाविकांनी देखील येथील शिव मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त महादेवाचे दर्शन घेण्याची पर्वणी साधली.





