पुणे जिल्हा : जातीभेदाला मूठमाती देत समाज एकसंध ठेवा

हभप गणेश कांगणे यांची माहिती
सोमेश्वरनगर : समाज जर एकसंध ठेवायचा असेल तर जातीभेदाला मुठमाती द्यायला हवी. शाश्वत विकासासाठी विज्ञानाबरोबरच अध्यात्माचीही गरज आहे, असे मत ह.भ.प. गणेश महाराज कांगणे यांनी व्यक्त केले.
आरंभ सामाजिक प्रतिष्ठान सोमेश्वर पंचक्रोशी या प्रतिष्ठान मार्फत सात दिवस शिव महापुराण कथेचे आयोजन केले होते. मु, सा, काकडे महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या प्रबोधनात कांगणे महाराज बोलत होते. प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभरामध्ये विविध उपक्रम राबविले जातात. राम कथेबरोबरच वृक्षारोपण आणि शैक्षणिक कार्यक्रम राबविले जातात. ह. भ. प गणेश महाराज कांगणे यांच्या वाणीतून रामकथा झाली. महाराजांनी या कथेतून समाजाचे आचार विचार कसे असावेत,
याबद्दल माहिती दिली. समाज जर एकसंध ठेवायचा असेल जाती जातीमधील भेद कमी करावा, असा संदेश दिला. सातव्या दिवशी कथेची सांगता झाली. यावेळी सर्व पंचक्रोशीतील महिला युवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चेतन कुमार सकुंडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मंगेश मासाळ, शैलेंद्र ठाकर, किरण बारभाई, सुजित सावंत, कृष्णा कोळेकर, हेमंत जाधव, लोकेश सत्यगिरी, बाळकृष्ण भोसले, संभाजी भुजबळ, प्रमोद फरांदे व आरंभ सामाजिक प्रतिष्ठानचे सर्व युवक सहकारी उपस्थित होते.





