Pune District : पालखी स्वागतासाठी काटेवाडीकर सज्ज

काटेवाडी –राज्याच्या कारभारामध्ये कायम सक्रिय असलेले व्यक्तिमत्व स्वच्छतेच्या प्रणेत्या व राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांना आपल्या काटेवाडी गावाबद्दल किती मोठ्या प्रमाणात आपुलकी आहे. याचेच उदाहरण म्हणजे एवढ्या मोठ्या व्यापातून देखील श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्या निमित्त काटेवाडी या आपल्या गावी येऊन गावातील सर्व परिसराची पाहणी करून योग्य प्रकारे स्वच्छता बाबतच्या सूचना दिल्या.
श्री छत्रपती साखर कारखान्याचे संचालक अनिल काटे, काटेवाडी गावचे उपसरपंच मिलिंद काटे, माजी सरपंच विद्याधर काटे, माजी उपसरपंच श्रीधर घुले, राजेंद्र पवार, दिलीप काटे, के. टी. जाधव, प्रकाश काटे, दत्तात्रय काटे, शितल काटे, राजेंद्र सोलनकर, अॅड. राजेंद्र मासाळ, धीरज घुले, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे,
पोलीस पाटील सचिन मोरे व ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर गावातील अनेक कार्यकर्ते ग्रामस्थ यांनी गावातील स्वच्छता केली होती. परंतु ज्या काही उनिवा दिसल्या त्या उणीवांच्या सूचना खासदार सुनेत्रा पवार यांनी दिल्याने त्याही सूचनांचे पालन ग्रामस्थांनी करून श्री संत
तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी केली आहे उद्या शुक्रवार (दि. 27) रोजी दुपारी 12 वाजता काटेवाडी गावामध्ये श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन होणार असून पालखीचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण गाव सज्ज झाले आहे.





