पुणे जिल्हा : कारवार एव्हिएशनचे शिकाऊ विमान दुर्घटनाग्रस्त; महिला उमेदवार जखमी
Updated On:

बारामती : कारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान कडबनवाडी, (ता. इंदापूर, जि. पुणे) गावचे हद्दीत सकाळी साडेअकरा वाजण्याची सुमारास कोसळले असून यामध्ये एक शिकाऊ महिला उमेदवार भाविका राठोड (२२ वर्ष रा. पुणे )किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
कारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान हे इंधन संपल्यामुळे कडबनवाडी गावचे हद्दीत कोसळले. भविका राठोड या किरकोळ जखमी झाले असून त्यांना औषधउपचारासाठी नवजीवन हॉस्पिटल, शेळगाव या ठिकाणी पाठविण्यात आले आहे.
इतर कोणत्याही प्रकारची हानी नाही, घटना ठिकाणी कारवार एव्हिएशन बारामती यांचे स्टाफ हजर असून योग्य बंदोबस्त घटनास्थळी ठेवला आहे.





