दौंड : दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदासाठीचे आरक्षण सोडत आज दौंड प्रशासकीय इमारतीतील सभागृहात पार पडली आहे. दौंड तालुक्यातील आगामी 70 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत आज काढण्यात आली आहे . यापूर्वी दि. 27 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडून 10 सरपंचपदाचे आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली होती व उर्वरित 70 ग्रामपंचायतीसाठी आज सोडत जाहीर करण्यात आली आहे. दौंड तहसील कार्यालयात आज झालेल्या सोडतीतील निश्चित झालेल्या ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे – बोरीऐंदी – अनुसूचित जाती स्त्री, पारगाव – अनुसूचित जाती स्त्री, वडगाव बांडे – अनुसूचित जाती स्त्री, मलठण – अनुसूचित जाती स्त्री, कौठडी – अनुसूचित जाती स्त्री, वाटलूज – अनुसूचित जाती, पाटेठाण – अनुसूचित जाती, भरतगाव – अनुसूचित जाती, लडकतवाडी – अनुसूचित जाती, देवकरवाडी – अनुसूचित जाती, कुसेगांव – अनुसूचित जमाती, हिंगणीगाडा – अनुसूचित जमाती स्त्री, नायगांव- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, खोरवडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री कुरकुंभ – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, राजेगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, डाळिंब – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, कोरेगाव भिवर – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, मिरवडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, गलांडवाडी -नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, दापोडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री नंदादेवी – नागरिकांचा मागास प्रवर्ग, खोर – नागरिकांचा मागास प्रवर्ग, दहिटणे – नागरिकांचा मागास प्रवर्ग, केडगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग, पडवी – नागरिकांचा मागास प्रवर्ग, खडकी – नागरिकांचा मागास प्रवर्ग, पिंपळगांव – नागरिकांचा मागास प्रवर्ग, चिंचोली – नागरिकांचा मागास प्रवर्ग, कानगांव – सर्वसाधारण स्त्री, पांढरेवाडी – सर्वसाधारण स्त्री, हिंगणीबेर्डी – सर्वसाधारण स्त्री, कडेठाण – सर्वसाधारण स्त्री, नानविज – सर्वसाधारण स्त्री, खामगांव – सर्वसाधारण स्त्री, पेडगांव – सर्वसाधारण स्त्री, बोरिबेल – सर्वसाधारण स्त्री, भांडगांव – सर्वसाधारण स्त्री, देउळगांवगाडा – सर्वसाधारण स्त्री, हातवळण – सर्वसाधारण स्त्री, लिंगाळी – सर्वसाधारण स्त्री, टाकळी – सर्वसाधारण स्त्री, सोनवडी – सर्वसाधारण स्त्री, वाळकी – सर्वसाधारण स्त्री, यवत – सर्वसाधारण स्त्री, उंडवडी – सर्वसाधारण स्त्री, गिरीम – सर्वसाधारण स्त्री, आलेगाव – सर्वसाधारण स्त्री, वाखारी – सर्वसाधारण स्त्री, बोरीपार्धी – सर्वसाधारण स्त्री, नांदूर – सर्वसाधारण स्त्री, वडगांव दरेकर – सर्वसाधारण, बिरोबावाडी – सर्वसाधारण, बोरिभडक – सर्वसाधारण, गोपाळवाडी – सर्वसाधारण, लोणारवाडी – सर्वसाधारण, खुटबाव – सर्वसाधारण, मळद – सर्वसाधारण, शिरापूर – सर्वसाधारण, नानगांव – सर्वसाधारण, गार – सर्वसाधारण, खोपोडी – सर्वसाधारण, पाटस – सर्वसाधारण, रावणगांव – सर्वसाधारण, सहजपूर – सर्वसाधारण, ताम्हणवाडी – सर्वसाधारण, वरवंड – सर्वसाधारण, कासुर्डी – सर्वसाधारण, खानवटे – सर्वसाधारण, पानवली – सर्वसाधारण. दहा पैकी चार गावांत चुरस दि.27 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सरपंच पदासाठीचे आरक्षण निश्चित झालेले ग्रामपंचायतीचे नाव व सरपंच पदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे – जिरेगाव – अनुसूचित जाती स्त्री, रोटी – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, राहू – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, एकेरीवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग, टेळेवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग, देलवडी – सर्वसाधारण, नाथाचीवाडी – सर्वसाधारण, देऊळगाव राजे – सर्वसाधारण, पिलानवाडी – सर्वसाधारण, वासुंदे – सर्वसाधारण स्त्री.