Pune District : जुन्नर उपविभागीय बाजार समिती पतसंस्थेतर्फे 12 टक्के लाभांश

अध्यक्ष सागर लाखे : 40 वी वार्षिक सर्वसाधारण राजगुरूनरात उत्साहात
दावडी – जुन्नर उपविभागीय बाजार समिती सेवक सहकारी पतसंस्थेने गतवर्षी 30 लाख 65 हजार रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. यासोबतच, सभासदांना 12 टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. भविष्यात सभासदांना त्यांची वर्गणी, शेअर्स, कर्ज यासारखी सर्व माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याची योजना असल्याचे अध्यक्ष सागर लाखे यांनी सांगितले.
जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर आणि मावळ या पाच तालुक्यांतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्ष क्षेत्रात कार्यरत असलेल्या जुन्नर उपविभागीय बाजार समिती सेवक सहकारी पतसंस्थेची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात खेळीमेळीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली, त्यावेळी लाखे बोलत होते.
याप्रसंगी खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील, संचालक हनुमंत कड, अशोक राक्षे, माणिक भोगाडे, खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक भास्कर जगदाळे, सरपंच संतोष गाडी, शिरूर बाजार समितीचे संचालक बंडूशेठ जाधव यांच्यासह पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत टकले, संचालक चेतन रुकारी, संजय शिंदे, दत्तात्रय धुमाळ, दीपक मस्करे, किसन खेंगले, संतोष थीगळे, रवींद्र लवांडे, ज्ञानेश्वर आडकर, महेश सातपुते, संचालिका निर्मला लोहकरे, पूजा फुलपगार, तज्ज्ञ संचालक शरद घोंगडे, सचिव गणेश गावडे यांच्यासह खेड बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे, जुन्नर बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे,
मंचर बाजार समितीचे सचिव सचिन बोर्हाडे, शिरूर बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले आणि पाचही बाजार समित्यांचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवानिवृत्त सभासद धोंडीभाऊ बच्चे व भगवान साळवे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यासोबतच इयत्ता 10 वी आणि 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या मुला-मुलींना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. पतसंस्थेचे सचिव गणेश गावडे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले,तर उपाध्यक्ष प्रशांत टकले आभार मानले.
वैशिष्ट्य रुपयांत
वसूल भागभांडवल : 1 कोटी 57 लाख
सभासदांच्या ठेवी : 94 लाख
एकूण उत्पन्न : 37 लाख 91 हजार





