Pune District: निमगाव सावा येथे जुन्नर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा

विजेत्यांसाठी मोठे बक्षीस
बेल्हे – माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार अतुल बेनके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान आणि संकल्प युवा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे १८ ते २४ ऑक्टोबर दरम्यान ‘जुन्नर प्रीमियर लीग’ (जे.पी.एल.) क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जुन्नर प्रीमियर लीगचे हे १२ वे पर्व असून, या स्पर्धेचे दरवर्षी उत्कृष्ट आयोजन करण्यात येते.
भव्य क्रिकेट मैदान, प्रेक्षकांसाठी सोयीसुविधा, उत्कृष्ट खेळाडू आणि विविध राज्यातील आयकॉन खेळाडू व संघमालक हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. या क्रिकेटच्या महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी सर्व क्रिकेट प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्याकडून करण्यात येत आहे.
बक्षिसे
प्रथम – १ लाख २५ हजार
द्वितीय – १ लाख
तृतीय – ७५ हजार
चतुर्थ – ५१ हजार





